Saturday, 7 March 2020

संशोधनाच्या आवडीमुळे जनसंपर्काच्या विषयात केली पीएचडी

एम मास कमुनिकेशन करीत असतानाच वर्गाच्या पहिल्या दिवशी परिचय करून देतानाच संशोधन करणार असे सांगितले होते. मास कमुनिकेशन करण्याआधीपासून मी शरदचंद्र पवार महाविद्यालय सोलापूर येथे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम करीत होतो. इंग्रजी विषयातून सेट नेट उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नही करीत होतो. पण  तिसर्या पेपरला अपेक्षित मार्क मिळत नव्हते प्रत्येक वेळी दोन तीन मार्कांनी  निकालात नाव रोल नंबर येत नव्हते. इंग्रजी वाचनाची आवड असल्याने इंग्रजी विषय शिकवत असल्यामुळे मला इंग्रजी आशय आणि संभाषणात गोडी रुची होती. त्यामुळेच मी एम मास कमुनिकेशन करण्याचे ठरवले. सकाळी साडे सात ते साडे अकरा पर्यंत च्या वेळी इंग्रजी विषय अध्यापन करीत आणि बारा ते सहा या वेळेत विद्यापीठात मास कम्युनिकेशन चा विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करीत. त्या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी ही दोन्ही भूमिका माझ्या संशोधन वृत्तीमुळेच शक्य झाले. आणि त्यामुळेच माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. सामाजिक शास्त्र संकुलात शिक्षण घेत असतानाच माझे शिक्षक प्राध्यापक डॉ. आर बी चिंचोलकर यांनी माझी संशोधन वृत्ती ओळखली. माझे इंग्रजी आणि मला ओळखणारे अनेक शिक्षक चिंचोलकर सरांना माहीत होते. त्या कारणामुळे सरांनी मला जनसंपर्क या विषयात संशोधन कर असे मार्गदर्शन केले. त्यांच्या त्या विश्वासामुळे माझ्या संशोधनाचा विषय हा भारतातील व्यवसायिक जनसंपर्क करणाऱ्या संस्थेचा अभ्यास सुरू केला. डॉ. आर बी चिंचोलकर सरांमुळेच माझे संशोधन पूर्ण झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला 17 राज्यातून माझ्या संशोधनाचा डेटा मिळवता आला. तसेच आंतरराष्ट्रीय जनसंपर्काची मुलाखत घेतली, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी प्राप्त झाली. भारतातील व्यावसायिक जनसंपर्काची संस्था कोणकोणत्या आहेत, ते काय काम करतात, त्यांचे उपक्रम कोणते हे फारसे सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहीत नव्हते. टीचर कॅटेगिरीतुन मी अविष्कार महोत्सवांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. आणि त्यावेळी मला पर्यवेक्षकांनी सांगितले होते की तुमचा विषय चांगला आहे. संशोधन साहित्य कमी असले तरी त्यामध्ये संशोधन करता येईल असे सांगितले. त्या प्रेरणेनेच मी अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय जनसंपर्क वरील पुस्तके ग्रंथ शोधनिबंध मिळवले अभ्यासले. त्यासाठी मी पुणे, कोल्हापूर, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, दिल्ली, कर्नाटक, येथील ग्रंथालयांना भेटी दिल्या आणि त्या संदर्भाचा मी अभ्यास केला. संशोधन करीत असताना संशोधन थांबवावं असं माझ्या व्यक्तिगत कारणामुळे वाटलं होतं. परंतु डॉ. माया पाटील मॅडम डॉ. गौतम कांबळे सर डॉ प्रभाकर कोळेकर सर डॉ प्रकाश वानखडे सर आणि डॉभानूमते सर यांच्या मार्गदर्शनामुळे, सल्ल्यामुळे मी पुन्हा काम सुरू केलं. खरेतर, एकदा माझा मोबाईल म्हणजे माझा लॅपटॉप चोरीला गेला आणि संपूर्ण माहिती चोरीला गेली. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण डॉ आर बी चिंचोलकर सरांच्या मुळे मी पुन्हा सर्व माहिती नव्याने मिळवली . काही माहिती तज्ञांच्या मदतीने पुन्हा आहे तशी माहिती मिळवली. डॉ प्रभाकर कोळेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे माझे संशोधन लवकर पूर्ण झाले. संशोधन क्षेत्रातील मार्गदर्शक मित्र डॉ गजधाने डॉ गाढवे डॉ पवार डॉ इनामदार डॉ होटकर डॉ राऊतराव डॉ चंदनशिवे मॅडम इत्यादी.  सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांच्या प्रेरणेने मी माझे संशोधन पूर्ण केले. शरदचंद्र पवार महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, एल बी पी महाविद्यालय ,सोलापूर, सर्व सहकारी मित्र सामाजिक शास्त्र संकुलातील प्राध्यापक माझे कुटुंब या सर्वांचे मला सहकार्य आणि प्रेरणा मिळाली. संशोधनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश ,गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, बंगाल, झारखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, पंजाब, ओडिसा, गोवा अशा 17 राज्यातून मला माहिती गोळा करावी लागली. तसेच, काही राज्यांना प्रत्यक्ष भेटी द्यावे लागले. पी आर एस आय आणि पी आर सी आय या संस्थेचे अध्यक्ष डॉ जयराम डॉ पाठक सर्व सभासद यांची खूप मदत झाली. त्यांच्या सर्व शाखांचे ही मला मदत मिळाली.  डॉ आर बी चिंचोलकर सरांनी मुलाखतीसाठी पीपीटी करून  प्रात्यक्षिक घेतले.  त्यामुळे तोंडी परीक्षा चांगली दिली. त्यावेळी कोल्हापूरच्या डॉ निशा पवार या बहिस्त पर्यवेक्षक म्हणून होत्या.  तर डॉ महेंद्र कदम हे तोंडी परीक्षा चे चेअरमन होते. त्यांनी उल्लेख केला की सर्व परीक्षकांनी माझ्या प्रबंधाला अधिक गुण दिले आहेत .ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, तेव्हा मला माझ्या संशोधनाचे काम समाधानकारक वाटले. माझ्या नावासमोर डॉक्टर लागणार याचा माझ्या वडिलांना खूप आनंद होता. पण, दुर्दैवाने माझ्या तोंडी परीक्षेला माझे वडील नव्हते कारण अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते निधन पावले. मला त्यादिवशी माझ्या वडिलांची खूप आठवण झाली. माझ्या वडिलांच्या प्रयत्नांमुळेच मी शिकलो आणि पीएचडी ही पूर्ण केलं. सध्या मी त्यांच्यावरच एक पुस्तक लिहीत आहे. आप्पा आणि आम्ही असं पुस्तकाचं नाव आहे.  आमच्या घराण्यात  मी पहिला आहे ज्याच्या नावासमोर डॉक्टर आहे. माझ संशोधन हे भारतातील जनसंपर्क विषयी आहे. संशोधकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.  तसेच भारताबाहेरील जनसंपरकातील नवे प्रवाह त्यातील बदल यावर संशोधन करण्यास संशोधकांना संधी आहे. माझ्या मते संशोधन हे आपल्याला सामाजिक दर्जा सुधारण्याचे काम करते. संशोधनातून सामाजिक दर्जा सुधराला पाहिजे. कृतीची माहिती देणे हा संशोधनाचा हेतू आहे.  संशोधनातून स्वतःचा आणि राष्ट्चा विकास होतो हे खरे आहे. त्यासाठी प्रत्येक विध्यार्थी, विध्यार्थीनी यांनी संशोधन करावेच.  
डॉ अंबादास लक्ष्मण भासके 9822883978                                       

No comments:

Post a Comment

मीडियाचे भविष्य

  मीडियाचे भविष्य 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात इंटरनेटच्या मुख्य प्रवाहातील परिचयाने नवीन आणि रोमांचक संप्रेषण पद्धत...